International Journal of Multidisciplinary Trends
  • Printed Journal
  • Refereed Journal
  • Peer Reviewed Journal
Peer Reviewed Journal

2025, Vol. 7, Issue 6, Part B

भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटलायझेशनचा प्रभाव


Author(s): सुनिता यादव कोरडे, प्राजक्ता दत्तू गाडगे

Abstract: डिजिटल अर्थव्यवस्था ही एक नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे जी ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल वित्तीय सेवा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, संगणक गेम आणि क्लाउड सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप आयोजितकरण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाचा वापर करते. डिजिटल तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाच्या वापरामुळे ऑनलाइन व्यवसाय संवादांकडे लक्षणीय बदल झाला आहे.
डिजिटलायझेशन म्हणजे आर्थिक विकासाशी निगडित असणाऱ्या तसेच इतर तांत्रिक घटकांमध्ये अंतर्गत वबाह्य संबंधित होणाऱ्या बदलांचा सुसंगत विविध विद्यमान आणि विकसनशील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे होय. जेणेकरून ग्राहकांना चांगला सेवा आणि वित्तीय सुविधा अनुभव कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे मिळतील मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या योजना आपल्या देशाच्या उज्वल आणि शाश्वत औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र आहे. शासन देशातील प्रत्येक क्षेत्राला,सामाजिक आर्थिकघटकाला एकत्र आणण्यासाठी हाय स्पीड बँडविड्थ सह कनेक्टिव्हिटी प्रदान करताना तंत्रज्ञान अवलंबनास प्रोत्साहन देत आहे. यामुळे आपल्या देशातील कधीही प्रकाश झोतात न आलेली मोठी बाजारपेठ ही डिजिटल कनेक्टिव्हिटी साठी खुली झाली आहे.त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात भारतात आर्थिक विकास घडून येताना दिसत आहे.युनिफाईड पेमेंट्स इनफास्ट्रक्चर (यूपीआय),भारत इंटरफेस फॉर मनी ( भीम) मोबाईल मनी, ई-वॉलेटस सारख्या बँकेद्वारे डिजिटल पेमेंट सेवांनी भारतीय वित्तीय बाजारपेठेत एक प्रकारची क्रांती घडवून आणली आहे. भांडवल केंद्रित जागतिक तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि प्रक्रियांची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून एकत्रित ग्राहक अनुभव जलद उत्पादन अमर्याद बँकिंग व्हॅल्यूम वित्तीय प्रणाली समावेशन कार्यात्मक कार्यक्षमता अर्थव्यवस्थेचे प्रमाण इत्यादी द्वारे ग्राहकांचे कल्याण साधले जात आहे. डिजिटलायझेशनमुळे आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता आणि ग्राहकांच्यासेवांमध्ये सुधारणा झाली आहे.


Pages: 81-83 | Views: 86 | Downloads: 39

Download Full Article: Click Here

International Journal of Multidisciplinary Trends
How to cite this article:
सुनिता यादव कोरडे, प्राजक्ता दत्तू गाडगे. भारताच्या आर्थिक विकासावर डिजिटलायझेशनचा प्रभाव. Int J Multidiscip Trends 2025;7(6):81-83.
International Journal of Multidisciplinary Trends
Call for book chapter
Journals List Click Here Research Journals Research Journals